Online Education | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना संकट काळामध्ये (Corona Pandemic)  आता यंदाचं शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे. दरम्यान ऑनलाईन शिक्षण सुरू असलं तरीही पुन्हा शाळा कधी सुरू होणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे. अशामध्येच आता दिवाळी अगदी आठवड्याभराच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. यामध्ये मुलांच्या दिवाळीच्या सुट्टीचं (Diwali Vacation)  काय? असा प्रश्न होता. पण आता शालेय विभागांकडून 12 ते 16 अशी 5 दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. दरवर्षी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना किमान 15-21 दिवसांची दिवाळीची सुट्टी असते पण यंदा हा कालावधी अवघ्या 5 दिवसांवर आल्याने अनेकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दिवाळीची 5 दिवसांची सुट्टी ही राज्यातील सरकारी आणि एडेड स्कूल्ससाठी लागू असेल. Varsha Gaikwad: महाराष्ट्रातील शाळा दिवाळीनंतर सुरु होणार? पाहा काय म्हणाल्या, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड.

यंदा कोरोना संकटामुळे गणेशोत्सव, नवरात्र साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. परिणामी त्याच्या सुट्ट्या शाळांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक परिषदेकडून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सुट्ट्या वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच मुलं मागील काही दिवसांत सुट्टी न मिळाल्याने सतत ऑनलाईन होते त्यामुळे शाळांनी आपल्या अधिकारातील 76 पैकी 18 सुट्ट्या पूर्वीप्रमाणे देण्याचे नियोजन करावे अशी मागणी जोर धरत आहे. Guidelines On Reopening Universities, Colleges: देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरु करण्यासाठी UGC ने जारी केली मार्गदर्शक तत्वे; 50 टक्केच विद्यार्थी राहतील उपस्थित.

शिक्षण विभागाने जारी केलेल्या नोटीसीमध्ये शैक्षणिक वर्षात 76 दिवसांच्या सुट्ट्या असतात. तर पहिली ते पाचवी साठी 200 दिवस आणि सहावी ते आठवी साठी किमान 220 दिवस वर्ग चालवणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सुट्टी 12-16 नोव्हेंबर असेल.

यंदा केवळ 5 दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर झाल्याने शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये थोडा नाराजीचा सूर आहे.