Diwali Vacation 2020 Extends For Schools: खुशखबर! महाराष्ट्रातील शाळांच्या दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी वाढवला, 20 नोव्हेंबर ऑनलाईन वर्ग राहणार बंद
Education Minister Varsha Gaikwad (PC - MahaDGIPR)

यंदा कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलॉकच्या टप्प्यात शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. मात्र दरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. त्यामुळे ऑनलाईन शाळेला कधी सुट्टी मिळणार याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहात होते. मात्र ऑनलाईन शाळांना 12 ते 16 नोव्हेंबर (Diwali Vacation) सुट्टी देण्यात आली होती. मात्र केवळ पाचच दिवसांची सुट्टी मिळाल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली होती. मात्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी या दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी वाढविला असून 20 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आली आहे.

यासंदर्भातील एक पत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मात्र वर्षा गायकवाडांनी ही सुट्टी वाढवली असून विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी आनंदाची बातमी दिली आहे. दरवर्षी दिवाळीची सुट्टी 21 दिवसांची असते. मात्र यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा उशिरा उघडल्याने दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आली.

हेदेखील वाचा- Diwali Vacation 2020 For Schools: महाराष्ट्रात यंदा शाळांना 12-16 नोव्हेंबर दिवाळीची सुट्टी; ऑनलाईन वर्ग बंद राहणार

यंदा कोरोना संकटामुळे गणेशोत्सव, नवरात्र साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. परिणामी त्याच्या सुट्ट्या शाळांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी सतत ऑनलाईन क्लासेस मध्ये व्यस्त दिसले. मात्र आता दिवाळीची सुट्टी देखील कमी केल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. मात्र ही सुट्टी आता वाढविण्यात आली आहे.

दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणं शक्य नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.