Sushant Singh Rajput Suicide | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Social Media Trends About Sushant Singh Rajput: सोशल मीडियातून अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्याविषयी एक ट्रेंड चालवल्याचे पाहायला मिळाला. जो अतिशय विचलित करणारा आहे. कोणत्याही प्रकारचा मजकूकर, छायाचित्र, प्रतिमा सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी त्याची सत्यता आणि तो समाजाला हानी पोहोचवणार नाही याची काळजी घ्यायला हवी. समाजमनाला विचलित करणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर कडक कायदेशीर करवाई केली जाईल, असे महाराष्ट्र सायबर विभागाने म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी रविवारी (14 जून) आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडिया आणि विविध क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले गेले. दरम्यान, सोशल मीडियावर त्याच्याबाबत नेटीझन्सकडून एक ट्रेंडही चालवला गेला. जो आक्षेपार्ह असल्याचे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी म्हटले आहे. (सुशांत सिंह राजपूत याच्या निधनामुळे क्रीडाविश्वालाही जबर धक्का; विरेंद्र सेहवाग, सायना नेहवाल, शिखर धवन यांच्यासह क्रीडापटूंनी व्यक्त केल्या भावना)

महाराष्ट्र सायबर ट्विट

ट्विट

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी म्हटले आहे की, आम्ही असे पाहिले आहे की काही वापरकर्ते (यूजर्स) आक्षेपार्ह / अपमानजनक / बदनामीकारक / दुर्भावनापूर्ण पोस्ट पोस्ट करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहेत. असा यूजर्सवर महाराष्ट्रातील सायबर गुन्हे अन्वेषण विभागाची नोडल एजन्सी महाराष्ट्र सायबर पोलिस विभाग याद्वारे भारतीय दंड संहिता कलम 149 of (1/n) अन्वये कारवाई करेन.

ट्विट

ट्विट

दरम्यान, सायबर कायद्याचे उल्लंघन करणारा मजकूर, प्रतिमा, चित्रफिती सोशल मीडियावरुन हटविण्यात याव्यात असे अवाहनही महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.