महाराष्ट्र: दिलासादायक! अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीसाठी राज्य सरकारकडून देण्यात येणा-या दुस-या टप्प्यातील 125 कोटी निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतक-यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. ज्यावर त्यांचे पोट चालते त्याचे नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Disasters) झालेले हे प्रचंड नुकसान बळीराजा पुरता हवालदिल झाला होता. यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला होता. त्यामुळे राज्य सरकारने या अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी करुन त्यांना विशेष मदत जाहीर केली. ही मदत टप्प्याटप्यांने शेतक-यांपर्यंत पोहोचले अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. यातील पहिला टप्पा झाला असून आता दुसरा टप्पा सुरु होत आहे. यात राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला 125 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

यामध्ये पहिल्या टप्प्यात सरकारकडून मिळालेल्या मदतीपासून वंचित राहिलेल्या अतिवृष्टीग्रस्तांना ही मदत होणार आहे. लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, दीड लाखांहून अधिक शेतकरी या मदतीच्या प्रतिक्षेत आहे. दुस-या टप्प्यांतील हा निधी लवकरच शेतक-यांच्या खात्यात जमा होणार आहे.हेदेखील वाचा- CM Uddhav Thackeray Vidarbha Tour: शेतकरी, प्रकल्पग्रस्तांची गर्दी पाहून मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थांबवला आपला ताफा; पाहा व्हिडिओ

खरीप हंगामाच्या शेवटी लातूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, चाकूर, रेणापूर, उदगीर या तालुक्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले होते. त्यापैकी 3 लाख 85 हजार शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात 128 कोटी 44 लाख शेतक-यांना प्राप्त झाले होते. त्यातील उर्वरित शेतक-यांना आता दुस-या टप्प्यात मदत केली जाणार आहे.

यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला 125 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यात गावानुसार मदतीचे वाटप केले जाणार आहे.  दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूरमधील घोडाझरी कालव्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे हे पुढील कार्यक्रमासाठी निघाले. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हे पाहताच उद्धव ठाकरे यांनी आपला ताफा थांबवून शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला आहे.