Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

 Mumbai Shocker: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. ट्रोम्बे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार केली नोंदवली आहे. मुलगी आणि तिचा भाऊ गेले काही वर्ष पश्मिम बंगालमध्ये आईसोबत राहत होते, वडिलांपासून वेगळे झाले होते. महिलेने दुसरे लग्न केल्यामुळे दोघामुलांना वडिलांकडे राहण्यास पर्याय नव्हता त्यामुळे ते दोघे तीन महिन्यापुर्वी मुंबईत आले. वडिलांविरुध्दात पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी घरी एकटी असताना, तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. (हेही वाचा- वडिलांनी मोबाईलचा जास्त वापर करण्यास दिला नकार;

सुत्रांनुसार, मुलीला एके रात्री आरोपीने जवळ झोपण्यास सांगितले. मध्यरात्री आरोपीने पीडित मुलीला अयोग्यरित्या स्पर्श केल्याच तीला समजले. तीने या गोष्टीला टाळाटाळ केली. त्यानंतर काही दिवसांनी मुलीसोबत लैंगिक विषयावर बोलण्यास सुरुवात केली. ८ ते ९ डिसेंबर रोजी घरी कोणी नसताना मुलीचा हात पकडला आणि तिला बळजबरीने अंगाला स्पर्श करू लागला. मुलीने या घटनेची माहिती शेजारी असलेल्या महिलेला सांगितले. त्यानंतर महिलेने धैर्य दाखवत, पोलिस ठाण्यात धाव घेतला.

ट्रोम्बे पोलिसांनी महिला आणि पीडित मुलीची तक्रार नोंदवून घेतला. पोलिसांनी एकाच वेळी आरोपीची पत्नी, मुलीचा भाऊ आणि शेजारच्या महिलेसह तिच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवला. या जबाबांचा पुरावा म्हणून आरोपपत्रात समावेश केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. त्याच दिवशी आरोपीला पोलिसांनी अटक केली.