धुळवड (Dhulwad Festival) सणाला काही तासांचाच आवधी बाकी असताना एका शेतकऱ्याच्या आनंदावर विरजन पडले आहे. या शेतकऱ्याचा तब्बल 84 किलो वजनाचा पंचक्रोशीत चर्चेत असलेला बोकड (Goat ) चोरीला गेला आहे. ऐन धुळवड सणात चोरट्यांनी डाव साधला आहे. इंदापूर (Indapur) तालुक्यातील सरडेवाडी येथील शिंदेवस्ती शिवारात ही घटना घडली. इंदापुरात अजय नावाचे एक तरुण शेतकरी (Young Farmer) आहेत. त्यांचा शेळी फार्म असून त्यात विविध प्रकारच्या शेळ्या आणि बोकड असतात. त्यातच एक बिटल प्रजातीचा बोकड होता. सुदृढ शेळ्यांची पैदास करण्यासाठी हा बोकड त्यांनी पाळला होता. पंचक्रोशीत या बोकडाची जोरकस चर्चा होती. त्यामुळे हाच बोकड चोरीला गेल्याने परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.
चोरट्यांनी केवळ बोकडच नव्हे तर एक उस्मानाबादी शेळीही पळवली आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड सणाला मांसाहार करण्याचा रिवाज आहे. त्यामुळे बोकड, शेळी, मेंडीला मोठी मागणी असते. ही मागणी विचारात घेऊनच चोरट्यांनी डाव साधला असावा असा अंदाज आहे. साधारण 84 किलो वजनाच्या या बोकडाची बाजारभावाप्रमाणे अंदाचे किंमत 45 हजारांच्या आसपास आहे. तर शेळीही साधारण 15 ते 18 हजार रुपये किमतीची आहे, असे शेतकऱ्याने सांगितले. या घटनेबाबत अजय यांनी इंदापूर पोलिसांमध्ये रितसर तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा, Modi Bakra in Sangli: सांगली जिल्ह्यातील चोरी गेलेला 16 लाखांचा 'मोदी बोकड' सापडला; पोलिसांकडून 3 संशयित आरोपी ताब्यात)
ग्रामिण अर्थव्यवस्थेत पशुपालन हा मोठ्या प्रमाणावर केला जाणारा व्यवसाय आहे. शेतीला परस्परपूरक जोडधंदा असल्याने शेलीपालन केले जाते. अलिकडील काळात मांसाहार करणाऱ्यांकडून मागणी वाढल्याने शेळी पालन व्यवसायाला मोठा भाव आला आहे. ग्रामीण भागात असलेला असा व्यवसाय करायचा म्हटले तर अनेक संघर्षाला, संकटाला शेतकऱ्याला तोंड द्यावे लागते. अनेकदा लांडगे, तरस अशा हिंस्त्र प्राण्यांकडूनही प्राण्यांना जपावे लागते. हे कमी की काय म्हणून आता ग्रामीण भागात प्राणी चोरणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता नवेच संटक उभा राहिले आहेत.