Dhule Zilla Parishad Election Results 2020: धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आघाडीवर, महाविकाआघाडी पराभवाच्या छायेत
Dhule Zilla Parishad | (File Image)

Dhule Zilla Parishad Election Results 2020: धुळे जिल्हा परिषद 2020 साठी एकूण 56 गटांसठी 112 गणांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (8 जानेवरी 2019) पार पडत आहे. या 56 गटांपैकी 26 गटांतील जनमताचे कल मतमोजणीदरम्यान हाती आले आहेत. यात काही विजयी जागांचाही समावेश आहे. हाती आलेला एकूण कल पाहता धुळे जिल्हा परिषदेत भाजप विजयी मुसंडी मारण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत हाती आलेल्या अंदाजानुसार भाजप 20, शिवसेना 1, कँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि इतर 1 अशा जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, धुळे जिल्ह्यातील पाच जण आगोदरच बिनविरोध निवडूण आल्यामुळे आता इथे केवळ 51 जागांसाठी निवडणूक पार पडली आहे. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकासआघाडी (शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस) असा सामना पाहालया मिळाला. धुळे जिल्हा परिषद अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. इथे आजी विरुद्ध माजी असाही राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.

धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसाठी तर महाविकासआघाडीसाठी बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अमित देशमुख, दादा भुसे या मंत्र्यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकासांठी दिग्गजांनी प्रचारसभा घेतल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती. (हेही वाचा, Maharashtra ZP Election Results 2020 Live Updates: आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना धक्का; पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ मधून पराभव)

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना पाहायला मिळत असला तरी, काही गटांमध्ये मात्र महाविकाआघाडी पॅटर्न यशस्वी झाला नव्हता. उदा. शिरपूर तालुक्यात काही जागांवर महाविकासआघाडी आकारास येऊ शकली नाही. त्यामुळे इथे बहुरंगी निवडणूक झाली. इतर ठिकाणी मात्र, भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा थेट सामना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असे राजकीय समिकरण महाविकासआघाडीच्या रुपात पहिल्यांदाच पाहायला मिळाले.