धुळे लोकसभा मतदारसंघ: भाजपचे डॉ. सुभाष भामरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल पाटील संघर्षात भाजप बंडखोर आमदार अनिल गोटे यांची उमेदवारी निर्णायक
Dhule Lok Sabha Constituency | (Kunal Patil And Dr. Subhash Bhamre)

Dhule Lok Sabha Constituency: केवळ 2009 आणि 2014 हा अपवाद वगळता धुळे लोकसभा मतदारसंघ हा 1962 ते 2009 पर्यंत सलगपणे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून निवडूण जाणारे प्रतिनिधी बदलले पण पक्ष तोच राहिला. 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 या काळात अनुक्रमे प्रताप सोनावने आणि डॉ. सुभाष भामरे हे या मतदारसंघातून भाजपचे खासदार राहिले. लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) मध्येही भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात रष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने कुणाल पाटील (Kunal Patil) यांना रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, वंचीत बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार मालेगावचे राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक नबी अहमद आणि अपक्ष उमेदवार म्हणून भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे हे देखील मैदानात असल्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. परंतू, सामनाही चौरंगी होणार आहे.

सुरुवातीला धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार डॉ. सुभाष मोरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील अशी लढत रंगेल असे चित्र होते. मात्र, भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी जाहीर करत निवडणुकीतील अपेक्षीत रंगत वाढवली. त्यातच वंचित बहुजन आघाडी तर्फे मालेगावचे राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक नबी अहमद यांनी उमेदवारी दाखल केली. धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत. असे असले तरी थेट लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच होत आहे. अर्थात भाजप बंडखोर आमदार केवळ मते खातात की, थेट मातब्बरांना धक्का देत विजयावरच शिक्कामोर्तब करतात याबाबत उत्सुकता आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तर काँग्रेसतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी विशेष म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तर काँग्रेसतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आपापल्या पक्षाची महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात धुळे येथूनच केली. अर्थात या सभा लोकसभा निवडणुका आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झाल्या. मात्र तरीही या सभांमुळे हा मतदारसंघ महाराष्ट्रभर चर्चेत आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडी आणि भाजप - शिवसेना युती अशा दोन्हीकडी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

दरम्यान, भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद हे आपापल्या पातळीवर कशी कामगिरी करतात. तसेच, इतर उमेदवारांचे उपद्रवमुल्य किती आणि कसे यावरही विजयाचे गणीत अवलंबून असणार आहे. या मतदारसंघात 29 एप्रिल 2019 रोजी मतदान पार पडणार आहे.