धनंजय मुंडे यांना Coronavirus ची लागण झाली असली तरीही प्रकृती स्थिर, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार होणार
धनंजय मुंडे(Edited and archived images)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांसह बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. याच दरम्यान सामान्य व्यक्तीपासून ते राजकीय मंडळींना कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यानंतर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना कोरोनासंबंधित उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. परंतु मुंडे यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसून आली नसल्याचे ही सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार असे सांगण्यात येत होते की, धनंजय मुंडे यांच्यासह 5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच या सर्वांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याचे ही सांगण्यात आले होते. तरीही त्यांचे कोरोना व्हायरसचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.(सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना COVID-19 ची लागण- मिडिया रिपोर्ट्स)

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 97 हजार 648 पोहचला आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 590 जणांनी आपला जीव गमवला आहे. मात्र, राज्यात गेल्या 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. यात मुंबईतील रुग्णांचा अधिक समावेश आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.