धनंजय मुंडे(Edited and archived images)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. असे असताना अनेक सामान्यांपासून अनेक राजकारणी, कलाकारांमध्येही कोविड-19 (COVID-19) ची लक्षणे दिसून येत आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिडिया रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे. या बातमीने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. सूत्रांनुसार, असे सांगण्यात येत आहे की, धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या 5 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. या लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.

धनंजय मुंडे हे महाविकास आघाडीचे तिसरे नेते आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना कोरोनाची लागण झाली होती. या आजारावार मात करुन हे दोन्हीही नेते आता बरे झाले आहेत.

हेदेखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना व्हायरसच्या 1540 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 53,985 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 97 हजार 648 पोहचला आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 590 जणांनी आपला जीव गमवला आहे. मात्र, राज्यात गेल्या 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. यात मुंबईतील रुग्णांचा अधिक समावेश आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.