कोरोना विषाणूच्या (Coronavirus) बाबतीत देशात महाराष्ट्र व राज्यात मुंबई (Mumbai) हॉटस्पॉट बनले आहेत. महाराष्ट्र सध्या 1 लाख रुग्ण संख्येच्या उंबरठ्यावर उभा आहे, तर मुंबईत आज 1540 नवीन रुग्ण व 97 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 53,985 झाली आहे. शहरात आज 516 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, आतापर्यंत 24209 लोक बरे झाले आहेत. सध्या शहरात 27,824 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 1952 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चाचण्यांबाबत बोलायचे झाले तर, 10 जून 2020 पर्यत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या या 2,42,923 इतक्या झाल्या आहेत.
97 मृत रूग्णांपैकी (43 मृत्यू 7 जून अगोदरचे आहेत.) 65 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 63 रुग्ण पुरुष व 34 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 10 जणांचे वय 40 वर्षा खालील होते, 53 जणांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त होते. तर उर्वरित 34 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबईच्या धारावीमध्ये (Dharavi) आज 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, 20 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 1984 वर पोहोचली आहे. आतापर्यंत धारावीत 75 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
97 deaths and 1540 new positive cases of COVID-19 reported in Mumbai. The total number of positive cases in #Mumbai is now 53,985: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/q93lYEeysX
— ANI (@ANI) June 11, 2020
दरम्यान, राज्यात महाराष्ट्रात आज 3607 नवीन कोरोना बाधित संक्रमित रुग्णांची व 152 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 97,648 इतकी झाली आहे. यावरून आता पुढच्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 1 लाख रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. राज्यात आज नवीन 1561 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 46078 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 47,968 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.