शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत राज्य सरकारवर मोठी टीका केली होती. मध्यप्रदेशच्या सरकारने 6500 कोटी रुपये स्वत: देऊन शेतकऱ्यांची वीजबिले माफ केली आहे. ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) मध्यप्रदेशच्या वीजबिलाचा ऑडिओ ऐकवत वीज तोडणीवरुन टीका केली. राज्य सरकारने शेतकऱ्यांची वीजबिल माफी करावी, असे आवाहनही ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केले आहे. उद्धव ठाकरे बुलढाण्यातील शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते.
आता याला उत्तर देताना फडणविसांनी महावितरणच्या आदेशाची एक प्रत शेअर केली आहे, ज्यामध्ये म्हतके आहे – ‘सप्टेंबर 2022 अखेर कृषी ग्राहकांकडील एकूण थकबाकी 46047 कोटी झाली आहे. चालु आर्थिक वर्षात ग्राहकांकडून फक्त 297 कोटीचा भरणा करण्यात आला आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती विचारात घेता कृषी ग्राहकांनी किमान चालू वीज देयकाचा भरणा करणे आवश्यक आहे. सप्टेंबर तिमाहीसाठीची 1519 कोटीची चालू वीज देयके ग्राहकांना देण्यात आलेली आहेत.’
जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही...
महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे...
शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे! pic.twitter.com/GKdJfNeOqX
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 26, 2022
‘परंतु या कार्यालयाच्या असे निदर्शनास आले आहे की विविध विभागांमध्ये कृषी वीज देयक वसुलीबाबतचे वेगवेगळे निकष, जसे एक चालू वीज देयक अथवा दोन चालू वीज देयके किंवा इतर अशाप्रकारे लावण्यात येत असल्यामुळे कृषी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. या अनुषंगाने असे निर्देशित करण्यात येते की कृषी ग्राहकांकडून एका चालू वीज देयकाचा (Current Bill Only) भरणा करुन घेण्यात यावा, या व्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय किंवा जास्तीच्या थकबाकी वसूली करिता सक्ती करण्यात येवू नये. वरील निर्देशांची काटेकोरपणे व तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.’ (हेही वाचा: Uddhav Thackeray Speech: उद्धव ठाकरेंचा शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले - हा पक्ष आहे की चोरांचा बाजार?)
फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे दोन व्हिडीओदेखील शेअर केले आहे. ते म्हणतात, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही...! 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय्...’