Women Harassment Cases At COVID Centers: महाराष्ट्रात मागील काही काळात कोविड सेंटर आणि अन्यही ठिकाणी महिलांंवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत यामुळे महाराष्ट्र सरकारचे महिला सुरक्षा विषयात लक्ष नाही हे सिद्ध होत आहे याकडे सरकार व मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांंचे लक्ष वेधुन घेण्यासाठी आपण पत्र लिहिल्याची माहिती विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांंनी दिली आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने कोविड आणि क्वारंटाईन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंंदर्भात यापुर्वीसुद्धा पत्र पाठवले होते मात्र त्यावर कारवाई झालेली नाही म्हणुन हे पत्र पुन्हा पाठवत आहे असेही फडणवीस यांंनी विशेष अधोरेखित केले आहे. मुंबई: सरकारी हॉस्पिटल मध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग करणाऱ्याला 30 वर्षीय वार्ड बॉयला अटक
देवेंद्र फडणवीस यांंनी पुढे पत्रात म्हंंटलेय की, "अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे या विषयांवर साधा निषेध करताना सुद्धा दिसून येत नाही, हे आजचे वास्तव आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे,सातत्याने वाढणार्या आणि नित्य झालेल्या या घटना पाहता तातडीने कोविड सेंटर्ससंदर्भात एसओपी तयार करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक पातळीवर प्रशासन संवेदनशील झाले पाहिजे. आपण या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देउन लवकर योग्य त्या उपाययोजना कराल अशी अपेक्षा". देवेंद्र फडणवीस यांंचे पुर्ण पत्र वाचा
देवेंद्र फडणवीस ट्विट
कोविड सेंटर आणि इतरही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली लक्षणीय वाढ, महिला सुरक्षेच्या विषयात सरकारने कोणतेही लक्ष न देणे, आवश्यक उपाययोजना सरकारच्या प्राधान्यक्रमात नसणे इत्यादीबाबत मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरेजी यांना पत्र...@OfficeofUT #CoronaInMaharashtra #Covid_19 pic.twitter.com/guA2BgAmmJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 16, 2020
(मुंबई: मालाड येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका तरूणीचा विनयभंग; 2 जणांविरोधात गुन्हा दाखल)
दरम्यान, मागील काळात पनवेल (17 जुलै), सिंहगड (20 जुलै), इचलकरंजी (15 मे), नंदूरबार, चंद्रपूर, मालाड, मिरा-भाईंदर, मानखुर्द , बडनेर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये मागील काळात विनयभंंग आणि बलात्काराच्या घटना घडल्या होत्या या घटनांंचा फडणवीस यांंनी पत्रात उल्लेख केला आहे.