मुंबई: सरकारी हॉस्पिटल मध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग करणाऱ्याला 30 वर्षीय वार्ड बॉयला अटक
Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) च्या एका सरकारी हॉस्पिटल (नाव गुप्त) मध्ये एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांचा विनयभंग (Molestation) करणाऱ्या 30 वर्षीय वार्ड बॉय ला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)  अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत महिला डॉक्टरने तक्रार केली होती त्यानंतर त्वरित कारवाई करत पोलिसांनी या वार्ड बॉय ला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सदर वार्ड बॉयच्या नावे अन्यही डॉक्टर व कर्मचाऱ्यांसोबत हिंसाचार करण्याबाबतच्या तक्रारी आहेत. महिलेने तक्रारीत म्हंटल्याप्रमाणे गुरुवार आणि शुक्रवारी ही महिला डॉक्टर नाईट ड्युटी वर होती. हॉस्पिटल मध्ये या वार्ड बॉयने तिला मागून धरत तिचा विनयभंग केला होता.

यापूर्वी सुद्धा मुंबईच्या वॉकहार्ट हॉस्पिटल (Wockhardt Hospital) मध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली होती, यामध्ये तर चक्क रुग्णालयातील 34 वर्षीय डॉक्टरने 44 वर्षीय पुरुष रुग्णावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे समजत होते, या डॉक्टरवर कलम 377 अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता.

ANI ट्विट

महाराष्ट्रात व विशेषतः मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचे आकडे दिवसागणिक वाढत आहेत. अशावेळी वैद्यकीय विभागातील सर्वच कर्मचारी रात्रदिवस काम करत आहेत अशावेळी अशा प्रकारच्या घटना या महिला डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत सुद्धा प्रश्न निर्माण करत आहेत.