मेट्रो-3 (Metro-3) कारशेडबाबत सुरु असलेला वाद आता दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. या कारशेडची जागा बदलण्याचा घाट तसेच नवीन कमिटीचा निव्वळ फार्स असल्याचे सांगच मुंबईकरांचे आणि राज्याचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी भाजपचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात 'मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या मेट्रोच्या प्रश्नावर अतिशय अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे' असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
मेट्रो-3 कारशेड बाबतचा प्रश्न लवकर मार्गी लागावा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. "मुळात मेट्रो-3 च्या कारशेडसाठी आरेचीच जागा सर्वार्थाने योग्य असताना कांजुरमार्गच्या जागेचा आग्रह धरला जात आहे. आता तर काही प्रशासकीय अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यातून राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान तर होणारच आहे. शिवाय, मुंबईकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला मेट्रो प्रकल्प लांबणीवर पडणार आहे. मुळात मेट्रोचे कारशेड आरेत करायचे नाही, असा अहवाल आधीच तयार ठेऊन नवीन कमिटीचा फार्स करण्यात येत आहे" असा आरोप फडणवीसांनी या पत्रात केला आहे.हेदेखील वाचा- Aarey Protest: आरे वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्या 29 जणांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात; कलम 144 लागू
मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्याचा घातलेला घाट, आधीच अहवाल लिहून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स, राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड करण्याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची गरज याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र..#MumbaiMetro pic.twitter.com/CygnVSq3XJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2021
त्याचबरोबर "आरे कारशेडची जागा 2031 पर्यंतच पर्याय प्राप्त आहे आणि त्यानंतर नवीन जागा शोधावी लागेल, मात्र हे धादांत खोटे आहे" असं देखील फडणवीस यांनी सांगितलं आहे.
"आरे करशेडसंदर्भात आधीच जागा स्थानांतरणाचा अहवाल तयार केला आहे आणि समिती तसेच कंसलटन्टचा फार्स सुरू आहे. कारडेपो स्थानांतरित केल्यामुळे हजारो कोटी रुपयांचे होणारे नुकसान असेल किंवा खासगी व्यक्तींना हजारो कोटींचा फायदा असेल, या सर्व बाबतीत सत्य उघडकीस येईलच आणि त्यावेळी विनाकारण आपल्यावरही संगनमताचा आरोप होईल, म्हणून मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि तत्काळ आरे येथे कार डेपोचे काम सुरू करावे" अशी विनंती देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.