Devendra Fadnavis | (Photo Credits: ANI)

Devendra Fadnavis Visit at Rain Affected Districts:  राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचे सुद्धा फार मोठे नुकसान झाले आहे. याच कारणास्तव भाजप नेते देवेंद्र फडवणीस हे आजपासून तीन दिवस अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी आजपासून बारामती येथून त्यांचा दौरा सुरु केला आहे. त्यावेळी फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. ऐवढेच नाही तर केंद्र मदत करणार आहे. मात्र सद्यच्या घडीला केंद्राच्या मदतीची वाट पाहू नये. तसेच राज्य सरकार या प्रकरणी काय मदत करणार ते सुद्धा त्यांनी स्पष्ट करावे अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मंदिर उघडण्यावरुन पाठवण्यात आलेल्या पत्रासंबंधित सध्या वाद सुरु आहेत. मात्र ही वेळ आता वाद घालण्याची नसून शेतकऱ्यांचे लक्ष देण्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने राज्य सरकारने मदत करावी असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्याचसोबत आमचा दौरा घोषित करण्यापूर्वी कोणीही अतिवृष्टी जिल्ह्याच्या दौऱ्याचे नाव सुद्धा काढले नसल्याचा टोला ही फडवणीस यांनी लगावला आहे.(Uddhav Thackeray Solapur Visit: राज्याचे पैसे केंद्राने वेळीच दिले तर मदत मागण्याची वेळच येणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशणा)

तर देवेंद्र फडणवीस राज्यातील  एकूण 9 जिल्ह्यांना भेट देणार आहेत. त्यात पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद यांचा सुद्धा समावेश आहे. दौऱ्यामागील मुख्य कारण म्हणजे अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल आणि शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान यासाठीच फडणवीस अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. त्याचसोबत राज्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे पुराची परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणाहून आतापर्यंत  29 हजारांपेक्षा अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर पुर आणि भुस्खलनामुळे जवळजवळ 2 हजारांहून अधिक घरांचे नुकसान ही झाले आहे. सध्या विविध राज्यातील जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. तर सरकारकडून जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच कारणास्तव विविध परिसरात एनडीआरएफच्या तुकड्या ही तैनात केल्या गेल्या आहेत.