
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री पदावरुन केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'मला आजही मुख्यमंत्री (Chief Minister) असल्यासाखेच वाटते', असे देवेद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते बेलापूर येथे महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमात बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे राजकीयव वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. सत्ता गेल्याचे दु:ख वाटले असे विधान करुन देवेंद्र फडणवीस या आधी चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाबाबत विधान करुन फडणवीस चर्चेत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, नागरिकांना चांगल्या सेवा-सुविधा मिलाव्यात यासाठी आपण अनेक योजना आपल्या काळात आणल्या आणि राबवल्या. त्या कामांचा फायदा महिलांना मोठ्या प्रमाणावर होईल. नवी मुंबईमध्ये गणेश नाईक असतील किंवा ताई (भाजप आमदार मंदा म्हात्रे) असतील. तुमच्या कामामुळे महिलांना मोठा फायदा होईल. आपल्या माध्यमातून शहराचा विकास झाला. शहराचे सौंदर्य आणि स्वच्छता यामुळे हे शहर नेहमीच अग्रेसर राहिले असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (हेही वाचा, Amruta Fadnavis On Maharashtra Bandh: आज वसुली चालू आहे की बंद? अमृता फडणवीस यांचा महाविकास आघाडीला टोला)
ट्विट
Live | महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ | नवी मुंबई @mandamhatre https://t.co/fkMGgkAI3U
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 12, 2021
आपण कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचे नाही. त्यामुळे पाठीमागील दोन वर्षे मी एकही दिवस न थांबता जनतेच्या सेवेत आहे. मलाही जनतेने जाणवू दिले नाही की, मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी नेहमीच उत्तम काम करतो आहे. त्यात आपल्यासारखे सहकारी माझ्या सोबत आहेत. त्यामुळे आपण सोबत असल्याने मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत असल्याचे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.