Amruta Fadnavis & CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook & PTI)

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आज महाराष्ट्रात बंद (Maharashtra Band) पुकारला होता. या बंदमध्ये शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सहभागी झाले. एकीकडे बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून या बंदला विरोध केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी नुकतेच केलेल्या ट्विटमध्ये आज वसूली चालू आहे का बंद? असा प्रश्न विचारून महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. तसेच, महाराष्ट्र बंद नही है, असा हॅशटॅगही अमृता फडणवीस यांनी या ट्विटमध्ये वापरला आहे. हे देखील वाचा- Shiv Sena Dussehra Rally: यंदा सायनच्या 'षण्मुखानंद हॉल' येथे भरणार शिवसेनेचा दसरा मेळावा; 50 टक्के उपस्थितीसह भाषणाचे होणार थेट प्रक्षेपण

अमृता फडणवीस यांचे ट्वीट-

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. देशभरातून भाजपाविरोधी पक्षांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने आज बंदची हाक दिली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाने पेट घेतल्याचे दिसत आहे. या बंदला समिश्र प्रतिसाद मिळत असताना भाजपकडून विरोध केला दर्शवला जात आहे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.