Assembly Election 2022: गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपच्या विजयाचे 'यांना' दिले श्रेय
Devendra Fadnavis (Pic Credit - ANI)

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) निकराची लढत होईल, असे मानले जात होते. पण असे झाले नाही. भाजप काँग्रेसपेक्षा खूप पुढे गेला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी गोव्यात भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली जाऊ शकते. तीन अपक्ष उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. सध्या 40 पैकी 20 जागांवर भाजप तर 11 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. येथे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पक्ष टीएमसीही 3 जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाला येथेही 2 जागांवर आघाडी आहे.

या आकडेवारी आणि कलांवर भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र  फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यातील विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनी दोन जणांना दिले आहे. एक नाव गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि दुसरे नाव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. गोव्यात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर काम करेल, भाजपला धक्का बसेल, असे अनेकांना वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण असे झाले नाही. गोव्यात भाजपला मोठे यश मिळाले. हेही वाचा Sanjay Raut On Assembly Election: लढा अजून संपलेला नाही असं म्हणत संजय राऊतांनी दिली निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेमध्ये जो विश्वास निर्माण केला आहे, त्याचेच हे फळ आहे. यासोबतच प्रमोद सावंत यांनी गोव्यात ज्या पद्धतीने डबल इंजिनचे सरकार चालवले, त्यामुळे जनतेचा विश्वास आणखी वाढला. त्यामुळे या विजयाचे श्रेय पीएम मोदी आणि सीएम प्रमोद सावंत यांना जाते. गोव्यात भाजपने देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रभारी केले. गोव्यातील विजयाचा गेम प्लॅन तयार करण्यात फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका होती, हे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.

गेल्या वेळी गोव्यात भाजपला बहुमत मिळाले होते. यावेळी बहुमत मिळताना दिसत आहे. सध्या दिसत असलेल्या निवडणूक निकालांच्या चित्रानुसार भाजप 20 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 11 जागांवर पुढे आहे. तृणमूल काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना 3 तर आम आदमी पार्टीलाही 2 जागांवर यश मिळाले आहे. अशा स्थितीत गोव्यात सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.