Nashik Qxygen Tank leaked and Devendra Fadnavis, Chandrakant Patil and Pravin Darekar (photo Credits: ANI/Twitter)

नाशिक (Nashik) झाकीर हुसेन हॉस्पिटमध्ये ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती झाल्याची बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हे खूपच धक्कादायक आणि खेदजनक गोष्ट असल्याने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातोय. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा नाही म्हणून बोंब ठोकत असताना अशी दुर्घटना होणे हे खूपच दु:खद गोष्ट आहे असे सांगत विरोधकांनी राज्य सरकारावर सडकून टिका केली आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) तसेच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

प्रशासनाने आता तत्काळ गरजूंना मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले पाहिजे. या घटनेची सखोल चौकशी तर होईलच. पण भविष्यात अन्यत्र कुठे अशा घटना घडणार नाहीत, यादृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे असे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- Oxygen Tank Leaks at Nashik: महाराष्ट्र शोकमग्न आहे! नाशिक घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? असा सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

या घटनेची सखोल चौकशी व्हावी, सगळ्या रुग्णांना लवकरच सुखरुप स्थळी व्यवस्थित हलवले जावे आणि मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळाली पाहिजे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये ही गळती वॉल्व लिकेजमुळे झाली आहे. दरम्यान काही वेळातच तांत्रिक दुरूस्ती नीट करण्यात आली असून ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे असे सांगण्यात आले आहे.