Devendra Fadnavis | (File Image)

'देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महिलांवर जबरदस्त फिदा आहेत', हे वाक्य वाचल्यावर अनेकांच्य भुवया उंचावल्या असतील. पण, हे वाक्य खरे आहे. फक्त ते आम्ही म्हटले नाही इतकेच. तसेही चोवीस तास लोकांमध्ये राहाव्या लागणाऱ्या क्षेत्रात असल्यानंतर कोणत्याही व्यक्तीबद्दल असे वाक्य वापरले तर भुवया उंचावल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. तर, हे वाक्य उच्चारले आहे भाजपा (BJP) नेते आणि राज्याचे माजी सहकारमंत्री असलेल्या सुभाष देशमुख (Devendra Fadnavis) यांनी. तेही भर सभेत. निमित्त होतं सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याणनगर येथील रस्त्यांच्या विकास कामांच्या उद्घाटनाचे. सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या भलताच चर्चेचा विषय ठरला आहे.

सुभाष देशमुख यांनी कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री बोलताना देवेंद्र फडणविस यांचे तोंडभरुन कौतुक केले. देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात त्यांनी महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. ज्यामुळे महिला आणि मुलींना जोरदार फायदा होणार आहे. मुलींसाठी शिक्षण आणि आरोग्याच्या आणि इतरही अनेक योजनांसाठी निधी जाहीर केला. महिलांना तर बस प्रवास आर्ध्या तिकीटात जाहीर केला. मुलीच्या शिक्षणासाठी 4000 रुपये देण्याचे त्यांनी घोषीत केले. ती पाचवी-सहावीला जाता तिला 6000 रुपये द्यायचे ठरवले. या सगळ्या गोष्टींकडे पाहताना लक्षात येते की, देवेंद्र फडणवीस साहेब महिलांवर फिदा झाले आहेत. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Sanjay Raut: दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी; प्राथमिक अंदाज - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती)

व्हिडिओ

म्हणजे मुलगी पहिलीत असताना 4000 रुपये, ती पाचवी सहावीला गेल्यावर 6000 रुपये आणि पुढे आकरा-बारावीला गेल्यावर १५-१८ हजार रुपये देणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विचार केला तर असं लक्षात येते की, मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस हेच करणार आहेत. पण नेमकं काय झालंय माहिती नाही. पण, देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झाले आहेत, असे सुभाष देशमुख बोलत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते.