भारतामध्ये सध्या पाच राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. 3 डिसेंबरला या निवडणूकांचा निकाल लागणार आहे. या निवडणूकांकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिले जाते. राज्यातही विधानसभा निवडणूकी नंतर बदललेल्या राजकीय गणितांनंतर महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाचं लोकसभेच्या जागांसाठीचं विभाजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी जागावाटपाबद्दल माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात भाजपा लोकसभेच्या 26 जागा, अजित पवार गट 22 आणि शिंदे गट 22 जागांवर आपले उमेदावार देणार आहेत. असे फडणवीस म्हणाले आहेत. आता हा फॉर्म्युला शिंदे आणि अजित पवार गटाला मान्य होणार का? येत्या काळात स्पष्ट होईल.
सध्या राज्यात आरक्षणावरुन तणाव निर्माण झाला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं यावेळी म्हटलं आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या संबंध तणावाचे झाले आहेत.
महायुती कडून सर्व्हे झाला असून भाजपानेही स्वतंत्र सर्व्हे केला आहे. गेल्या वर्षी भाजपाने 25 जागा लढवल्या आणि 23 जागा जिंकल्या होत्या. त्यांच्यामते विदर्भामध्ये भाजपा मजबूत स्थितीत आहे तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि कोकण, मुंबई मध्ये शिवसेनेला जागा दिल्या जातील.