Devendra Fadnavis घेणार भाजप आमदारांची मुंबईत बैठक; काय असणार आहेत बैठकीतील 3 मुद्दे?
CM Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला  (BJP meeting of 105 MLAs) थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हे बैठक मुंबईतील वसंत स्मृती येथे होणार असून भाजपचे सर्व 105 निवडून आलेले आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत भाजपच्या सहयोगी पक्षांचे आमदार व भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार देखील या बैठकीला हजेरी लावणार असल्याचे आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या बैठकीत उपस्थित राहून सर्व निवडून आलेल्या आमदारांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आशिष शेलार यांनी सांगितल्यानुसार या बैठकीत सर्वात प्रथम अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जलदगतीने मदत मिळणे यावर चर्चा होईल, तसेच राज्यातील राजकीय स्थिती हा बैठकीतील दुसरं मुद्दे असेल. तसेच संघटनात्मक निवडणुका यांवर देखील बैठकीत चर्चा होणार आहे.

महाराष्ट्रातील सत्ता कोंडी लवकरच सुटण्याचे विजय वडेट्टीवार यांचे संकेत; शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत एकसुत्री कार्यक्रम मसुद्याचा ठरला ड्राफ्ट

यापलीकडे कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली तर ते बैठक संपल्यावर माध्यमांना कळवण्यात येईल असं देखील ते म्हणाले.

'महाशिवआघाडी' नैतिकतेला धरून नाही; शिवसेनेने स्वार्थासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसचा हात धरला, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

दरम्यान नुकतीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांतील बैठक संपली आहे. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लवकरच महाराष्ट्रात 'महाशिवआघाडी' सत्ता स्थापन करणार असल्याचे संकेत दिले. तसेच बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील सोनिया गांधी यांना पाठवण्यात येईल आणि त्यांनी एकदा होकार दिला की आम्ही सर्वच मुद्दे माध्यमांसमोर मांडू असं ते म्हणाले.