सी.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credit: ANI)

26/11 Terror Attack:  मुंबईतील 26/11 हल्ल्याला आज दहा वर्ष पूर्ण झाली आहे. मुंबईतील ताज हॉटेल आणि नजीकच्या परिसरामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सुमारे 166 जणांनी आपला प्राण गमावला होता.या हल्ल्यात समान्य नागरिकांसोबतच महाराष्ट्र पोलिस खात्यातील बड्या ऑफिसर्सचाही बळीघेतला होता.आज या हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत.

मुंबईवरील या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त मरीन ड्राईव्हच्या पोलिस जिमखान्यावर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिस खात्यातील मान्यवरांसोबतच महाराष्ट्राचे गर्व्हनर सी.विद्यासागर राव ( C Vidyasagar Rao) आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. 26/11 Mumbai Terror Attack : तीन दिवस चाललेल्या या हल्ल्याचा असा होता घटनाक्रम

166 लोकांचा बळी घेणार्‍या आणि 300 जखमींच्या आयुष्यातील या दुर्दैवी घटनेत सापडलेल्या एकमेव जीवंत दहशतवादी कसाबला फाशी देण्यात आली आहे.