महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने दिवसागणिक त्याच्या रुग्णांसह मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबून कोरोनाच्या विरोधात लढायचे आहे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. त्याचसोबत राज्यात आपण कोरोनाचे वेग संथ करण्यास यशस्वी झाल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी सर्वधर्मियांचे देशाप्रती करत असलेल्या कार्याचे त्यांनी आभार मानले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राजकरण न करता महाराष्ट्र सरकारला पाठिंबा दर्शवावा असे आवाहन केल्याने त्यांचे उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद मानले आहे. तसेच केंद्रातील काहींची नावे न घेता जे राजकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर सुद्धा निशाणा साधल्याचे दिसून आले. त्यानंतर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
देवेंद्र फडवणीस यांनी टीका करत असे म्हटले आहे की, कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. मात्र सत्ताधारी असणाऱ्या पक्षाच्या युतीत आणि सरकारी विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे ही विधान त्यांनी केले आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या टीकेवर आता काय उत्तर दिले जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राजकरण बाजूला ठेवता सद्यची राज्यातील कोरोनाची परिस्थितीचे भान ठेवून नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे.(Coronavirus In Maharashtra: लॉकडाउनमुळे कोरोनाचा वेग संथ ठेवण्यास सरकारला यश ते नागरिकांचे आशिर्वाद हेच बळ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद, पहा महत्वाचे मुद्दे)
Despite Maharashtra being worst hit by COVID-19, there is no coordination among ruling alliance partners and govt depts: Devendra Fadnavis
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2020
दरम्यान, राज्यात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहेत. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पार गेला आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधित रुग्णावर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून सर्वोतोपरी उपचार केले जात आहेत. तसेच राज्यात आता प्लाझ्मा थेरपीचा कोरोनाबाधितांवर प्रयोग केला जात आहे.