Jitendra Awhad | (Photo Credits: Twitter)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची सोमवारी विधान परिषदेच्या सभागृह नेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सभागृह सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी सोमवारी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा केली. दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी कामकाज सुरु होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. अजित पवार यांची विधानपरिषदेच्या सभागृह नेते पदी निवड झाल्याबदल राष्ट्रवादी नेते आणि राज्यगृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे कौतूक केले आहे. याशिवाय शिवसेना सदस्य गोपिकीशन बाजोरिया (Gopikishan Bajoria), राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे (Aniket Tatkare), अनिल सोले (Anil Sole), शिक्षक, आमदार दत्तात्रय सावंत (Dattatray Sawant) आणि काँग्रेसचे सुधीर तांबे (Sudhir Tambe) अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालिका सभापती म्हणून काम पाहणार आहेत.

महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर, अजितपवार हे उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात लवकरच नवे बदल घडतील, अशी अपेक्षा केली जात आहे. विधीमडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. याआधी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते. त्यांच्या जागी अजित पवार यांची निवड करण्यात आल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे मनापासून कौतूक केले आहे. हे देखील वाचा- Maharashtra Budget session 2020: शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मालिका कर्जमाफीच्या माध्यमातून सुरु: देवेंद्र फडणवीस

जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट-

विधीमडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला असून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून विधीमंडळाच्या पायऱ्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत फलक झळकवली. यावेळी सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मालिकाच रचत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी केला आहे.