कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व गणेशभक्त, गणेशमंडळांचे मानले आभार
Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले होते. राज्य सरकारकडून करण्यात आलेला आवाहनाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्व गणेशभक्तांसह गणेशमंडळाचे मनापासून आभार मानले आहे. तसेच महाराष्ट्रावरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी विघ्नहर्त्याला साकडेदेखील घातले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजिक कार्यक्रम लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली पार पडली आहेत. यामुळे यंदाचा गणेशोत्सवदेखील लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली साजरा करणे महत्वाचे होते. यामुळे गणेशभक्तांनी आणि मंडळांनी यावर्षीचा गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन राज्य सरकार वारंवार करत होते. यामुळे कोरोनाच्या संकटकाळात नियमांचे पालन शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व गणेशभक्त आणि गणेश मंडळाचे मनापासून आभार मानले आहेत. हे देखील वाचा- Ganesh Visarjan 2020: गणेश विसर्जन करताना दुर्घटना; राज्यात विविध ठिकाणी 16 जण बुडाले, 11 जणांचा मृत्यू, 2 बेपत्ता, तिघांना वाचवले

ट्विट-

महत्वाचे म्हणजे, कोरोना संकट लक्षात घेऊन मुंबईतील बरीच नावजलेल्या मंडळांनी यावर्षी गेणेशमूर्तीची स्थापना केली नाही. तसेच त्या ठिकाणी समाज प्रबोधन किंवा आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामुळे संपर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कौतूक केले जात आहे.