आज 15 ऑगस्ट, भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या जुलमी सत्तेतून स्वतंत्र झाला आणि भारताने तब्बल 150 वर्षांनंतर मुक्तपणे श्वास घेतला. आज देशभरात स्वातंत्र्य दिना उत्साहात साजरा केला जाईल. मात्र यंदा कोविड-19 च्या संकटामुळे काही बंधनं पाळावी लागणार आहेत. दरम्यान लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. दरम्यान 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope), राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ('आत्मनिर्भर भारत हा 130 कोटी भारतीयांचा मंत्र बनला आहे'; स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाल किल्ल्यावरुन देशावासियांशी संवाद)
उपमुख्यमंत्री अजित पवार:
भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! यानिमित्तानं स्वातंत्र्य लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद वीरांना अभिवादन!#IndependenceDayIndia pic.twitter.com/UW0AXs8RRr
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 15, 2020
राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे:
सर्व देशबांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हे स्वातंत्र्य चिरकाल राहो, यासाठी आपण सर्वजण कटीबद्ध राहू.पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. #IndependenceDay pic.twitter.com/UtqaXToIH9
— Supriya Sule (@supriya_sule) August 15, 2020
गृहमंत्री अनिल देशमुख:
आजच्या दिनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी बलिदान देणार्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करून, सर्वांना ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो! pic.twitter.com/Tl3A89U7in
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 15, 2020
आरोग्यमंत्री राजेश टोपे:
स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा! स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या अमर हुतात्म्यांना त्रिवार अभिवादन. #HappyIndependenceDay#15thaugust pic.twitter.com/P7CS2aU49t
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 15, 2020
दरम्यान भारताच्या स्वातंत्र्यदिनी कोरोनामुक्त महाराष्ट्राचा निर्धार करुया असं म्हणत मुख्यंमत्री कार्यालयातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
निर्धार स्वातंत्र्य दिनाचा, #कोरोनामुक्त महाराष्ट्राचा!#स्वातंत्र्यदिन
भारतीय स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएँ!
निश्चय स्वतंत्रता दिवस का,कोरोनामुक्त महाराष्ट्र का!#स्वतंत्रतादिवस
Hearty Greetings on Indian #IndependenceDay pic.twitter.com/59AknQ22nL
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 15, 2020
दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना संबोधित केले. यात त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. कोरोना योद्धांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आत्मनिर्भार भारताचे महत्त्व, उद्देश, योजना याबद्दल बोलत त्यांनी पुन्हा एकदा स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले.