Ajit Pawar Drives Electric Rickshaw: अजित पवार यांनी बारामती येथे चालवली इलेक्ट्रिक रिक्षा (Watch Video)
Ajit Pawar | (Photo Credits-Twitter)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) हे बारामतीच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक रिक्षाची (Electrick Rickshaw) चालवताना दिसले. देशातील महागाई दिवसेंदिवस अधिक विक्राळ स्वरुप घेताना दिसत आहे. त्यातच इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे प्रदुषणाचा भस्मासूरही मोठ्या प्रमाणावर डोके वर काढतो आहे. अशा वेळी इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicles) वापरणे फायद्याचे ठरु शकते. त्यमुळेच अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास धोरण जाहीर केले आहे. या धोरणाला प्राधान्य मिळावे यासाठीच अजित पवार यांनी बारामतीतील पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रिक रिक्षाची ट्रायल (Ajit Pawar drove an Electrick Rickshaw) घेतल्याचे पाहायला मिळाले.

बारामतीच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार पियाजो कंपनीला भेट दिली. या वेळी पियाजिओ कंपनीयच्या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांना कंपनीच्या उत्पादनाबाबत माहिती दिली. माहिती देत असताना अधिकारी म्हणाले. माहिती घेत असताना अजित पवार यांनाही कंपनीच्या इलेक्ट्रिक रिक्षाची ट्रायल घेण्याचा मोह झाला. लागलीच मग अजित पवार रिक्षावार स्वार झाले आणि त्यांनी एक फेरफटकाही मारला.  (हेही वाचा, Eknath Shinde Becomes BA Graduate: एकनाथ शिंदे झाले ग्रॅज्युएट! रिक्षाचालक ते कॅबिनेट मंत्री आणि आता पदवीधर; जाणून घ्या प्रवास)

ट्विट

अजित पवार यांनी कंपनीच्या आवारातच रिक्षाचा फेरफटका मारला. स्वत: उपमुख्यमंत्री रिक्षा चालवत असल्याचे पाहून कंपनीतील कर्मचारीही काही वेळी आश्चर्यचकीत झाले होते. या वेळी अजित पवार यांनी रिक्षाच्या विविध फिचर्सबाबत माहिती जाणून घेतली. रिक्षात असलेल्या बॅटरीची क्षमता किती आहे. मायलेज किती आहे. अॅव्हरेज किती पडते. ताशी किती किलोमीटर वेगाे ही रिक्षा धावू शकते. सुरक्षेच्या दृष्टीने काही नवी प्रणाली रिक्षात वापरण्यात आली आहे काय? असा विविध मुद्द्यांची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अजित पवार यांनी जाणून घेतली. आजच्या महागाई आणि प्रदुषण वाढीच्या कालात इलोक्ट्रीक वाहने वाढल्यास आनंद आहे. खिशाला परवडणाऱ्या दरात ही वाहने सर्वसामान्यांना उपलब्ध झाली तर अधिक सोयीचे होईल, असेही अजित पवार या वेळी म्हणाले.