
इंडिगो (IndiGo Flight) च्या दिल्ली गोवा (Delhi-Goa) विमानाचे बुधवार 16 जुलै च्या संध्याकाळी मुंबई मध्ये Emergency Landing झाले. सूत्रांच्या माहितीनुसार विमानाचे इंजिन हवेतच फेल झाल्यानंतर विमान मुंबईत उतरवण्यात आले. दरम्यान या विमानाचे मुंबईत लॅन्डिग झाले असून सारे प्रवासी, क्रु मेंबर्स सुरक्षित आहेत. फ्लाईट Airbus A320neo होते. इंडिगोच्या या विमानाचे मुंबईत रात्री 9.52 च्या सुमारास लॅन्डिग झाले.
इंडिगो च्या जारी स्टेटमेंट मध्ये विमानात तांत्रिक गोंधळ झाल्याने विमानाचे तातडीने लॅन्डिग करावे लागल्याचे सांगण्यात आले आहे. "एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दिल्ली-गोवा मार्गावर धावणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-6271 ला पूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली आहे," असे सूत्रांनी सांगितले.
"16 जुलै रोजी दिल्लीहून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा साठी निघालेले विमान फ्लाइट 6E-6271 मध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. प्रक्रियांनुसार, विमान तातडीने वळवण्यात आले आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले," असे इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले.
"विमान पुन्हा सुरू करण्यापूर्वी आवश्यक तपासणी आणि देखभाल केली जाईल, परंतु प्रवास पूर्ण करण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे, जे लवकरच प्रवाशांना घेऊन निघेल," असे प्रवक्त्याने सांगितले.
'PAN PAN PAN' कॉल
एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन AI 171 च्या अपघातानंतर विमान अपघात आणि इमरजन्सी लॅन्डिग़च्या घटनांकडे काटेकोरपणे पाहिले जात आहे. दरम्यान HT च्या रिपोर्ट्सनुसार, विमानात अवकाशात असताना एका इंजिन मध्ये बिघाड झाल्यानंतर पायलटने हा कॉल देत विमान मुंबई मध्ये उतरलं.