Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी स्वतःचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत परिवहनमंत्री अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी आज मुंबईतील शिवसेनेच्या विभागांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकता मंच तसेच श्री. चैतन्य ओंकार ट्रस्ट यांच्या सहकार्याने 13 रुग्णवाहिकांचे तर जाणीव ट्रस्ट तर्फे 12 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

येत्या 27 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांनी सामाजिक उपक्रमांसह आपला वाढदिवस साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. (हेही वाचा - मुंबईत कोविड19 चाचणी वाढवण्यासंदर्भात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र)

ट्विट-

दरम्यान, राज्यासह मुंबईत झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची लागणारी गरज ओळखत आज त्या उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोनासारख्या आजारात शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळेच या सर्व रुग्णवाहिका ऑक्सिजन सुविधेने सुसज्ज असून यात नवीन तंत्रज्ञानच्या स्ट्रेचरचा वापर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या पिढ्यांप्रमाणेच रुग्णवाहिका देखील अद्ययावत झाल्या आहेत. रुग्णवाहिका आणि शिवसेना हे नाते जुने असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.