पालघर मध्ये नाल्यात सापडला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह
Representational Image (Photo Credits: Twitter)

पालघर (Palghar)  मध्ये कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह गटारामध्ये आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मृत व्यक्तीचं नाव राहुल विश्वकर्मा असं आहे. मागील काही दिवसांपासून पालघर मध्येही प्रचंड पाऊस कोसळत आहे. या धुव्वाधार पावसामध्ये राहुल गटारात वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

स्थानिक फायरमॅनला 4 च्या सुमारास काल (6 जुलै) फोन कॉल आला. वसई टाऊनशिप जवळ मधुबन जवळ असलेल्या गटारात हा मृतदेह आढळला. अशी माहिती Vasai Virar Municipal Corporation's fire services कडून देण्यात आली आहे.

फायरमॅन तात्काळ घटनास्थळी पोहचला तेथून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला आणि तो तातडीने सरकारी रूग्णालयामध्ये पोस्टमार्टम साठी नेला.

विश्वकर्मा हा एका स्थानिक फॅक्टरी मध्ये काम करत होता. अशी माहिती स्थानिक वाळीव पोलिस स्टेशन मधून देण्यात आली आहे. राहुल विश्वकर्मा याची अपघाती निधनाची केस रजिस्टर करण्यात आली आहे.

दरम्यान ठाण्यात काल एका बाईकस्वाराचा खड्ड्यामध्ये बाईक टर्न होऊन पडून मृत्यू झाल्याची बाब देखील समोर आली आहे. दरवर्षी मुसळधार पावसासोबत या अपघाताच्या बातम्या देखील हमखास समोर येतात. हे मृत्यू टाळण्यासाठी आता प्रशासकीय पातळीवर विशेष पावलं उचलणं गरजेचे आहे.