Jalgoan News: विजेच्या जोरदार झटका लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू, जळगाव येथील घटना
Electric Shock | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Jalgoan News: घरातील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला जोरदर झटका बसला आहे.या झटक्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना जळगावातील अळमेर येथे घडली आहे. गावात आठ दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांनी पाण्याची मोटार बसवली होती. पण हीच मोटार एकाच्या जीवावर बेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे ही घटना घडली. या गावातील रहिवासी हर्शल योगेश पाटील (वय ११) याचा विजेच्या जोरदार झटक्याने मृत्यू झाला आहे. हर्शल गावातील सानेगुरुजी शाळेत सहावीत शिक्षण घेत होता. घरात कोणी नसताना मोटार चालू करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक मोटारच्या विजेचा जोरदार झटका लागला.

हर्शलचे आई वडिल शेतात गेले होते आणि मोठा भाऊ पेपर देण्यासाठी गेला होता. त्यामुळे घरात कोणीच नव्हते. हर्शलचे हात ओले होते त्यावेळीस त्यांने स्विच चालू केला त्यामुळे त्याला विजेचा जोरदार झटका लागला. झटका लागल्यामुळे हर्शल जिन्याखाली पडला. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. थोड्या वेळाने हर्शलचा मोठा भाऊ घरी आला आणि त्याने पाहिले की, हर्शल जमिनीवर निपचित पडला आहे. ही घटना आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी हर्शलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी उशिर झाल्याचे सांगून त्याला मृत घोषित केले. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.