Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गट (Thackeray Group) की शिंदे गट (Shinde Group), दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) शिवतीर्थावर (Shivtirtha) कोणाला परवानगी द्यावी, असा पेच मुंबई महापालिका (BMC) प्रशासनासमोर उभा राहिला होता. शिवतीर्थावर अर्थात दादरच्या (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. दोन्ही गट शिवतीर्थासाठी आग्रही आहेत. महापालिकेकडून दोन्ही गटांच्या अर्जाची छाननी सुरु आहे. परंतु नेमकी कोणाला परवानगी द्यावी याबाबत महापालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता दसरा मेळाव्याप्रकरणी एमएमआरडीएने (MMRDA) एक सुचक निर्णय दिला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC Ground) बीकेसी मैदानावर परवानगी देण्यात आली आहे.

 

बीकेसीतील (BKC) दुसऱ्या मैदानात सभेच्या परवानगीसाठी उध्दव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेनं (Shiv Sena) देखील एमएमआरडीएकडे (MMRDA) अर्ज होता. पण बीकेसीच्या दुसऱ्या मैदानासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठीचा करण्यात आलेला अर्ज (Application) फेटाळण्यात आल्याची माहिती आहे. तर शिंदे गटाला बीकेसीवर दसरा मेळाव्यास परवानगी देण्यात आली आहे.  एमएमआरडीएच्या परवागनीनंतर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार यावर शिक्कामोर्तब झाला असला तरी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवाजी पार्क मिळणार का यावरुन शिवसैनिकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Government: शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सचिवांना दिलेले विशेष अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे)

 

शिवतिर्थावरील (Shiv Tirtha) मेळाव्याबाबत संभ्रम असताना शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून बीकेसीतील (BKC) मैदानाबाबत अर्ज केला होता तरी शिंदे गटाचा हा अर्ज मान्य केला असुन उध्दव ठाकरे गटाच्या मेळाव्या करीता मात्र अजून कुठल्याही मैदानावर परवानगी मिळालेली नाही. तरी ठाकरे गटसाठी (Thackeray Group) दसरा मेळावा (Dasara Melava) एक सामान्य मेळावा नसून प्रतिष्ठेचा विषय असल्याने राज्यभरातील शिवसैनिकांना याबाबतच्या निर्णयाची उत्सुकता लागली आहे.