दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava 2020) यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी 50 जणांच्या उपस्थितीत पार पडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तडाखेबंद भाषण करत विरोधकांचा समाचार घेतला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेचा (Narayan Rane) उल्लेख बेडूक आणि त्यांची दोन पिल्ले असा केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे उघडले जात नाहीत म्हणून आम्हाला हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारणारे हे बाबरी पाडली होती तेव्हा शेपट्या घालून बसले होते असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. दरम्यान, तिन्ही पक्ष भिन्न विचाराचे असून हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका विरोधक वारंवार करत आहेत. यावरूनही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खडबोल सुनावले आहेत. काही लोकांना सत्तेचे स्वप्न पडत आहेत. अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचे ऐकू येत आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून केले आहे. हे देखील वाचा- BMC Elections 2022: मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्रच लढणार; शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
ट्विट-
दसरा मेळावा २०२० https://t.co/0VeGFShm0L
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) October 25, 2020