Sanjay Raut, Shiv Sena | (Photo Credits-ANI)

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 मध्ये (BMC Elections 2022) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रित निवडणूक लढवणार आहे. तसेच या निवडणूकीत शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सत्ता येणार, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोललो होतो की., मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार. भाजपसोबत युती झाली असती तरी शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असता. वर्षभरात जे जे साचले होते ते ते आज पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे एक एकाचा समाचार घेतील, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना संजय राऊत म्हणाले की, "शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवतील आणि ती जिंकतील. मुंबईत शिवसेनेशिवाय इतर कोण जिंकू शकेल? महाविकास आघाडी कायमस्वरुपी राहण्यासाठी येथे आहे. महाराष्ट्र सरकार 11 दिवसही टिकणार नाही, असे लोक म्हणत होते. सरकार महिन्याभरात पडेल, गणपतीला पडेल असे म्हणत होते. आता दसरा आला. आता बाँब त्यांच्याच खाली फुटतील. शिवसेनेची सर्व तयारी झाली असून आता त्या बाँबचे आवाज येतील, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Sanjay Raut on Devendra Fadnavis: कोरोनाची परिस्थिती किती गंभीर आहे? हे देवेंद्र फडणवीस यांना आता समजले असेल; शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विधान

मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत 227 जागांपैकी शिवसेनेला 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7 आणि इतर उमेदवारांना 14 जागांवर विजय मिळाला होते. त्यावेळी 84 जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला कडवी टक्कर देत 82 जागेवर विजय मिळवला होता.