दहिसर येथे रिक्षाची धडक लागून महिलेचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल
फोटो सौजन्य- फाइल इमेज

दहिसर (Dahisar) येथे रिक्षाच्या धडकेने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, ठाण्यात राहणाऱ्या शालिनी थॉमस ह्या दहिसर येथे मुलीला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या थॉमस यांनी समोरुन येणाऱ्या माणिक ठोकल नावाच्या रिक्षाचालकाने त्यांना धडक दिली. यामध्ये थॉमस यांना गंभीर दुखापत झाली.

(पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, उस्मानाबाद जिल्ह्यातील तलमोड गावातील घटना)

त्यानंतर थॉमस यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु थॉमस यांचाउपचारादरम्यान  मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना लवकरच अटक करण्यात आली आहे.