डहाणू (Dahanu) तालुक्यात माटगाव (Matgaon) येथे एका विखुरलेल्या मैदानात 25 गाईंचे मृतशरीर आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ही गुरे चरायला गेली असताना कोणाच्या तरी शेतात गवत खात असावीत आणि त्या गवतावर कीटकनाशक फवारलेली असल्याने विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक पोलीस याप्रकरणी शोध घेत असून गायीच्या मृत्यूचे कारण तपासले जात आहे. या गाई बेवारस आहेत त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर ताबडतोब तपास घेतला गेला नाही मात्र काही स्थानिकांना हे मृतशरीर दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या गायींचे शरीर सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून यानंतर या घटनेमागील कारण समजू शकेल.
माटगाव जवळ प्रचंड मोठ्या प्रमाणावर बागायती शेतशिवारे आहेत. रात्रीच्या वेळेस मोकाट गाईंचा तांडा कुंपणावरून उड्या मारून या शेतीचे नुकसान करतात. पोलिसांच्या अंदाजानुसार, हे नुकसान वाचवण्यासाठी एखाद्या भाजीपाल्यात थायमेट सारखे जहाल कीटकनाशक भरून, बागेच्या बाहेर लांबवर फेकून दिले जाते, शेतीबाहेरच ही फळे खाऊन गुरे मरतात. तर दुसरी शक्यता अशी की, काही बागायतदार भाजीपाला लागवडीवर कीटकनाशकांची फवारणी करतात. हा भाजीपाला खाऊन गुरांचा मृत्यू झाला असणार. Viral Video:औषधाची बाटली पालीने चाटतानाचा व्हिडीओ व्हायरल; पाहा औषधे सुरक्षित ठेवण्यासाठी काय घ्याल काळजी?
दरम्यान, या प्रकरणात सध्या तपास सुरु असून मृत गायींचा निश्चित आकडा अद्याप समोर आलेला नाही. याबाबत तपास पूर्ण झाल्यावर मृत गाईंच्या शरीराची विल्हेवाट लावण्यात येईल. यासाठी खड्डे खोदण्या करता, जेसीबी मशीन मागवण्यात आले आहे.