Dadra & Nagar Haveli Bypoll: दादरा-नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा, कलाबेन डेलकर यांचा 47,000 मतांनी दणदणीत विजय; भाजप, काँग्रेस धक्क्याला
Shiv Sena | (File Photo)

महाराष्ट्राच्या मातीत आणि मुंबईच्या कुशीत स्थापन झालेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्षाने राज्याची सीमा ओलांडून भगवा फडकवला आहे. शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांचा दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीत (Dadra & Nagar Haveli Bypoll Result) 47,000 मतांनी दणदणीत विजय (Kalaben Delkar Wins) झाला आहे. शिवसेना उमेदवारापुढे भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) अशा दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा पराभव झाला आहे. कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) या माजी खासदार दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत. डेलकर कटुंबीयांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई येथे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता. दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश असून तो दमन एवं दीवच्या कार्यक्षेत्रात येतो.

शिवसेनेच्या कलाबेन डेलकर आणि भाजपच्या महेश गावित यांच्यात प्रमुख टक्कर झाली. यात डेलकर यांनी भाजप उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला. निवडणुक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर अपडेट केलेल्या माहितीनुसार दुपारी 2.05 वाजता 22 वी फेरी संपली तेव्हा मतमोजणी पूर्ण झाली. तेव्हाच्या आकडेवारीनुसार कलाबेन डेलकर यांना 1,12,741 मते मिळाली. तर त्याच्या विरोधात असलेल्या भाजप उमेदवार महेश गावित यांना 63,382 मते मिळाली. (हेही वाचा, Dadra and Nagar Haveli: खासदार Mohan Delkar यांच्या पत्नीसह कुटुंबीयांच्या हाती शिवबंधन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करणार शिवसेना प्रवेश)

ट्विट

ट्विट

अपक्ष खासदार दिवंगत मोहन देलकर यांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक पार पडली. मोहन डेलकर यांनी 2019 मध्ये भाजपचे विद्यमान खासदार नटुभाई पटेल यांचा 7.001 मतांनी पराभव केला होता. डेलकर यांचा 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई येथे एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अनेक भाजप नेत्यांची नावे पुढे आली होती. आपल्या राजकीय जीवनामध्ये डेलकर यांनी विविध पक्षांकडून निवडणूक लढवली. त्यात ते विजयीही झाले. मात्र 2019 ची लोकसभा निवडणूक ते अपक्ष लढले आणि विजयी झाले.