अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी विधीमंडळामध्ये शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यात धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मीडीयारिपोर्ट्सनुसार, मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी केली आहे. पण याप्रकाराबद्दल मंत्री शंभूराजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणं टाळलं आहे. नेमक्या कोणत्या वादामधून हा प्रकार झाला हे समजू शकलेले नाही. काही वेळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे एकत्र विधानभवनाबाहेर आले मात्र या विषयावर बोलणं त्यांनी टाळलं आहे. महेंद्र थोरवे हे कर्जत खालापूरचे आमदार आहेत.
दरम्यान लॉबीतील या घटनेचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारकडून माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर विधानपरिषद सभागृह १ तासासाठी तहकूब करण्यात आलं. तर जितेंद्र आव्हाडांनी लॉबीत देखील पोलीस लावावे लागतील, विधानभवनात हमरीतुमरी होणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं. CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसऱ्या क्रमांकावर; Mood of The Nation सर्वेत केवळ 1.9 टक्के लोकांची पसंती .
मटाच्या वृत्तानुसार, प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आचारसंहिता लागण्यापूर्वी काम करुन द्या, अशी थोरवेंची भूमिका होती. आमदारांना वरिष्ठ मंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार असतो. चर्चा होत असते, त्याला वाद म्हणता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी अशा घटना घडल्या तेव्हा त्या व्यक्तींना ताकीद दिली असल्याचं सरनाईक म्हणाले आहेत.