मालाड येथे गॅस सिलिंडरचा स्फोट; 1 ठार, 4 जखमी
malad gas explosion (photo Credit: ANI)

मालाड (Malad) येथील एका चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला असून 4 गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मालवणी येथील एमएचबी कॉलनीत रविवारी सकाळी घडली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची पोलीस अधिक चौकशी करत आहेत. सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला? याची अद्याप माहिती समोर आली नाही.

मंजू आनंद असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला मलाड येथील एमएचबी कॉलनीतील (MHB Colony) रहवासी होती. परंतु रविवारी सकाळी 9  च्या सुमारास सिलिंडरचा झाला. सिलिंडरचा स्फोट इतका जोरदार होता की, त्यामुळे मंजू हिच्या घराची भिंत कोसळली. यात मंजूला आपला जीव गमवावा लागला. या घटनेत शितल काते , सिद्धेश काते, ममता पवार आणि अश्विनी जाधव या चौघांना गंभीर जखम झाले आहेत. जखमींना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच जखमींवर आवश्यक उपचार केले जात आहे. हे देखील वाचा- Plastic Ban: प्लास्टिक वापरल्यास नागरिकांना 1 लाख रुपयांचा दंड

ANI ट्विट-

गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, यामागे काय कारण होते? अद्याप याची माहिती समोर आली नाही. परंतु गॅस सिलिंडरचा स्फोट होणाऱ्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात. सिलिंडरचा स्फोट होण्यामागे अनेकदा हलगर्जीपणा आढळून आला आहे.