Cylinder Blast In Worli: मुंबई मध्ये मनीष कमर्शिअल सेंटर मध्ये सिलेंडरचा स्फोट; एक महिला जखमी
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

आज मुंबई मध्ये आज (18 सप्टेंबर) वरळीच्या जुन्या पासपोर्ट इमारतीतील तिस-या मजल्यावरच्या केमिकल लॅबमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. ही इमारत Manish Commercial Centre आहे. स्फोटाच्या मोठ्या आवाजानं वरळीत Annie Besant Road वर राहणार्‍या   नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची ही घटना सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघातामध्ये सुचित  रश्मी कौर  (Suchit Rashmi Kaur) ही 30 वर्षीय महिला जखमी झाली आहे. तिच्या डाव्या पायाला आणि  डोक्याला किरकोळ जखम झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तिने हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिला आहे.

मुंबईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात फारशी लोकं नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. मात्र रस्त्यावर खिडकीच्या काच्या फुटून विखुरल्या आहेत. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हा स्फोट 250 लीटरच्या Liquid Nitrogen Cylinder चा झाला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच 1 फायर इंजिन आणि 1 अ‍ॅम्ब्युलंस दाखल झाली आहे.

ANI Tweet

मुंबई मध्ये काल रात्री शहरात कलम144 विस्तारित करण्यात आले आहे. त्यानुसार ठिकठिकाणी नाकेबंदी आहे. तर शहरात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे.