Cyclone Tauktae: मोदीजी हा भेदभाव का? तौक्ते चक्रीवादळानंतर गुजरातला केलेल्या मदतीवरुन पृथ्वीराज चव्हाण यांचे टीकास्त्र
Prithviraj Chavan, PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) महाराष्ट्र आणि गुजरातसह पाच राज्यांना चांगलाच फटका बसला. समुद्र किनारपट्टीवरील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरात (Gujarat) राज्याचा हवाई दैरा केला. या दौऱ्यानंतर झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ गुजरात राज्यालाच मदत जाहीर करण्यात आली. या मदतीवरुन विरोधकांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. चक्री वादळामुळे गुजरातईतकाच महाराष्ट्रही बाधित झाला असताना मदत केवळ गुजरात राज्यालाचक का? हा भेदभाव कशासाठी? असा सवाल पंतप्रधान चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, तौक्ते चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे पाच राज्यांना मोठा फटका बसला. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरात राज्याचा दौरा केला आणि आर्थीक मदतीची घोषणा केली. हा भेदभाव कशासाठी? इतर राज्यांतील जनतेप्रती आपले काहीच उत्तरदायीत्व नाही काय? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी बुधवारी (19 मे 2021) दुपारी केली. या दौऱ्यानंतर पंतप्रदानांनी एक बैठक घेऊन गुजरातमधील वादळग्रस्तांना 1 हजार कोटी रुपयांची मदत तातडीने जाहीर केली. याशिवाय गुजरातमध्ये झालेल्या नुकसाणीची पाहणी करण्यासाठी एक केंद्रीय पथकही गुजरातला जाणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या याच भूमिकेवरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. (हेही वाचा, Mamata Banerjee Attacks PM After Meeting: पंतप्रधान मोदी यांच्या मीटिंगनंतर ममता बॅनर्जी भडकल्या; म्हणाल्या, आम्हाला बोलण्याची परवानगी दिली नाही)

पृथ्वीराज चव्हाण ट्विट

केंद्र सरकारने तौत्क्ते चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. केंद्रानेही तसे जाहीर केले आहे. परंतू, यावरुन उगाचच राजकारण केले जात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.