Cyclone Tauktae | (Photo Credits: IMD)

कोकण किनारपट्टीवर येत्या 16 ते 17 मे दरम्यना तोक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) येण्याची शक्यता आहे. तसा इशारा भारतीय हवामान (Meteorological Department) खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा अधिकाऱ्यांनी (Ratnagiri District Collector) रत्नागिरी समुद्र (Ratnagiri Coast) किनाऱ्यालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हावामान विभागाचा दाखला देत म्हटले आहे की, नागरिकांनी सतर्कता बाळगावी. चक्रीवादळ काळात नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

चक्रीवादळ काळात काय काळजी घ्याल?

  • मच्छिमार व इतर व्यक्तिंनी समुद्रामध्ये अजिबात जाऊ नये.
  • मच्छिमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षितपणे बांधून ठेवण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
  • आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असेल तर घरीच थांबा. घराच्या बाहेर पडू नये.
  • आपले घर जुणे आणि मोडकळीस आले असेल किंवा कच्चा स्वरुपाचे असेल तर आवश्यक साधनसामुग्री घेऊन उंच भागावर स्थलांतरीत व्हा.
  • आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना आगोदरच सुरक्षीत ठिकाणी दाखल करा.
  • आपल्या जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु उजेड व खाद्यपदार्थ बनविण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात. (हेही वाचा, Cyclone Tauktae: महाराष्ट्रात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा हवामान विभागाकडून इशारा, कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा आदेश)
  • सोबत आवश्यक अन्नपदार्थ, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावीत.
  • पिण्याचे पाणी शुद्ध करुन वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे.
  • अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्र किनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.
  • ग्रामकृतीदलाच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सिरक्षित उपाययोजना कराव्यात.
  • सद्यास्थितीत जिल्ह्यात होम क्वारंटाईन असलेले नागरिक व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवताना एकमेकांमध्ये मिळणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे.

    मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचाय/तहसीलदार कार्यालय/ जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी

  • क्रमांक 02352-226248, 222233 वर संपर्क साधावा किंवा 7057222233 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करावे.

हवामान विभागाने महाराष्ट्राला मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाचा इशारा दिला आहे दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची परीणिती चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या 24 तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पठ्ठ्याचे रुपांतर वादळात होईल. या वादळाला तोक्ते असे नाव देण्यात आले आहे. 15,16 आणि 17 मे या दिवशी येणाऱ्या या वादळामुळे मुसळधार पाऊस येऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.