Cyclone Tauktae: महाराष्ट्रात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा हवामान विभागाकडून इशारा, कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा आदेश
Cyclone Tauktae | (Photo Credits: IMD)

हवामान विभागाने (Meteorological Department) महाराष्ट्राला मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाचा इशारा दिला आहे दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची परीणिती चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या 24 तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पठ्ठ्याचे रुपांतर वादळात होईल. या वादळाला तोक्ते (Cyclone Tauktae) असे नाव देण्यात आले आहे. 15,16 आणि 17 मे या दिवशी येणाऱ्या या वादळामुळे मुसळधार पाऊस येऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने वादळाबाबत बोलताना म्हटले आहे की, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये 16 आणि 17 तारखेला या वादळाचा प्रभाव दिसू शकेल.शनिवारी सकाळपासून चक्रीवादळाचा प्रभाव सुरु होईल. रविवारी (16 मे) या दिवशी या वादळाची तीव्रता वाढेन. त्याचा परिणाम दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.दरम्यान, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि त्यासोबत गुजरात राज्यातील काही ठिकाणीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (हेही वाचा, Cyclone Tauktae Live Tracker Map: अरबी समुद्रात येणाऱ्या Tauktae चक्रीवादळाचा नेमका मार्ग, वेग, ठिकाण कसे पाहाल?)

हवामान विभागाने प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कता म्हणून ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. दरम्यान, Tauktae या वादळाचा नेमका मार्ग कसा राहील हे आपण इथे जाणून घेऊ शकता. दरम्यान, 2021 या वर्षात आलेले हे पहिले वादळ आहे. गेल्या वर्षीही आलेल्या वादळाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. खास करुन कोकणाती अंबा, फणस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.