Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मिळणार 15 हजारापासून दीड लाख लाखापर्यंत मदत; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
Uddhav Thakrey (Photo Credit: Twitter)

संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) कोरोना संकटाशी लढत असताना निसर्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarga) यात आणखी भर पडली आहे. निसर्ग चक्रीवादळाने राज्यात सर्वाधिक तडाखा राजगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने निसर्ग वादळग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच राज्य मंत्रिमंडाळाची बैठक पार पडली आहे. ज्यात निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांना 15 हजारपासून ते दीड लाखांपर्यंत मदत केली जाणार, असा निर्णय झाला आहे. याशिवाय वादळग्रस्तांना 2 महिन्यांचे अन्नधान्य दिले जाणार आहे. सोबतच निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वाढीव मदतीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे गेल्या आठवडयात राज्यातील प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना जोरदार फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत रायगड जिल्ह्याचा दौरा करून रायगडसाठी तातडीची मदत म्हणून 100 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यानंतर रत्नागिरीला 75 कोटी तर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला 25 कोटी रुपयांच्या तातडीची मदत जाहीर करण्यात आली होती. निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना राज्य सरकारच्या एनडीआरएफच्या नियमापेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे देखील वाचा- Lockdown: महाराष्ट्रात 30 जूननंतर पुन्हा लॉकडाउन वाढणार? पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दरम्यान, यापूर्वी पूर्णपणे नष्ट झालेल्या घराला 95 हजारांची मदत केली जात होती. परंतु, आता या मदतीत वाढ करण्यात आली असून ती दीड लाखांपर्यंत करण्यात आली आहे. तर काही प्रमाणात पडझड झाली आहे, त्यांना 6 हजारांहून 15 हजार रुपये मिळणार आहेत. तसेच ज्या लोकांच्या घराची पडझड झाली नाही मात्र, नुकसान झाले त्यांना 35 हजार रुपये देण्यात येणार आहे.