निसर्ग चक्रीवादळाने (Nisarga Cyclone) काही वेळापूर्वी रायगड (Raigad) जिल्ह्यात जोरदार धडक दिली आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग साधारणतः 100 ते 120 किमी प्रति तास इतका आहे. परिणामी अनेक भागात घरांवरची छपरे उडून गेल्याचे, रस्त्यावर उभी असणारी वाहने उडत असल्याचे प्रकार घडत आहेत. यातीलच एका घटनेचा व्हिडीओ सध्या ट्विटर वर पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ एनडीआरएफ (NDRF) च्या टीमकडून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ रायगड तालुक्यातील असून हे नेमके ठिकाण समजू शकलेले नाही. प्राप्त माहितीनुसार रायगड मध्ये दिवे आगार भागात लॅन्डफॉल सुरु झाले आहे. पुढील काही तास नागरिकांनी घरीच रहावं रात्री 12 पर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. निसर्ग चक्रीवादळाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
थरकाप उडवणाऱ्या या व्हिडीओ मध्ये एका रहिवाशी इमारतीच्या छपरावर असलेले पत्रे हे वाऱ्याच्या वेगाने उडून जात असल्याचे पाहायला मिळतेय. याठिकाणी झाडे सुद्धा वादळी वाऱ्यामुळे प्रचंड हलताना दिसत आहेत. रायगड सोबतच रत्नागिरी, अलिबाग, पासून किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस बरसायला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे भागातही त्याचा परिणाम दिसत आहे.
पहा व्हिडीओ
#WATCH Tin roof atop a building in Raigarh blown away due to strong winds as #CycloneNisarga lands along Maharashtra coast (Source: NDRF) pic.twitter.com/zTsQRNEAUH
— ANI (@ANI) June 3, 2020
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता लॅन्डफॉलनंतर निसर्ग चक्रीवादळ शांत होण्यासाठी पुढील 6 तासाचा कालावधी लागू शकतो. या काळात अत्यंत धोका दायक भागातील नागरिकांना दुसर्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे,रायगड,अलिबाग येथे एनडीआरएफ टीम सुसज्ज आहेच. नागरिकांनी सुद्धा आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.