Cyclone Nisarga Updates: निसर्ग चक्रीवादळ मुंबई पासून सुमारे 200 किमी अंतरावर; दुपारी 1 ते 3 दरम्यान दक्षिण अलिबागच्या पुढे सरकणार -IMD चा अंदाज
Satellite picture of cyclone Nisarga (Photo Credits: IMD)

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीजवळून जाणारे निसर्ग चक्रीवादळ आता अधिक तीव्र बनत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. ANI या वृत्त संस्थेला IMD Mumbai च्या शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ आता मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर आहे. तर आता या चक्रीवादळाने अरबी समुद्रामध्ये उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे रायगडमधील अलिबाग येथे लॅन्डफॉल होण्याची शक्यता आहे. तर अलिबागचा दक्षिणेकडील भाग हे चक्रीवादळ दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान पुढे सरकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने यापूर्वीच मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. High Tide in Mumbai: निसर्ग चक्रीवादळ काळात मुंबईत समुद्राला भरती, जाणून घ्या वेळ आणि लाटांची उंची

आज निसर्ग चक्रीवादळ दरम्यान वार्‍याचा वेग कमाल 120kmph होऊ शकतो असा अंदाजदेखील व्यक्त करण्यात आला आहे. चक्रीवादळाचा लॅन्डफॉल अलिबाग मध्ये होणार असल्याने तेथे धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सध्या अलिबागमध्ये उंचच उंच लाटा उसळत असल्याचं चित्र आहे.

ANI Tweet

पहा चक्रीवादळाचा प्रवास  

मुंबई मध्ये निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे. यामध्ये नागरिकांना बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान आपत्कालीन स्थितीमध्ये कार घेऊन बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र गाडीत हातोडा ठेवा. त्यामुळे गाडी जॅम झाली तर काच फोडून बाहेर पडता येईल असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये 8 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.