Cyclone | Representational Image (Photo Credits: PTI)

Cyclone Maha Update: ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यात उद्या (बुधवार,5 नोव्हेंबर 2019) मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात 'महा' चक्रीवादळ (Maha Cyclone) नर्माण झाले आहे. या वादळाचा परीणाम म्हणून राज्यातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, या पावसाचा सर्वाधिक फटका हा ठाणे आणि पालघर जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे. संभाव्य स्थिती विचारात घेऊन पालघर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच मच्छिमारांना समुद्रात न झाण्याचे तसेच, गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचे अवाहनही करण्यात आले आहे.

बुधवारी रात्री किंवा गुरुवारी (7 नोव्हेंबर 2019) पहाटेच्या सुमारास गुजरातमधील पोरबंदर आणि दीव दमन समुद्र किनाऱ्यावर महा चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. वादळाचा संभाव्य धोका विचारात घेऊन संमुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ जरी गुजरातला धडकणार असले तरी, त्याचा ठाणे आणि पालघर जिल्ह्याला मोठा फटका बसू शकतो. हे वादळाचे वारे ताशी 100 ते 120 किलोमीटर इतक्या वेगाने वाहणार आहे. त्यामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महा चक्रीवादळामुळे केवळ ठाणे, पालघरच नव्हे तर रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, नगर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि सातारा जिल्ह्यातही वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यत आहे. या जिल्ह्यांसोबतच हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Updates: 'महा' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा मच्छिमार्‍यांना सावधानतेचा इशारा, मुसळधार पावसाची शक्यता)

दरम्यान, संभाव्य वादळाचा धोका विचारात घेऊन पालघर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना ६ ते ८ नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, संभाव्य स्थितीत बचाव आणि मदतकार्य तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. तसेच, पालिका, महसूल, आरोग्य, वैद्यकीय पथक, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर सर्व यंत्रणाच्या अधिकारी- कर्मचारी वर्गाला मुख्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.