अरबी समुद्रात तयार झालेल्या क्यार चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसला आहे. तर वादळी वारे किनाऱ्यापासून ताशी 65 ते 80 किमी वेगाने वाहत असल्याने त्याचा फटका नजीकच्या गावांना बसला आहे. तसेच कोकणासह गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये सुद्धा क्यार चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्याचसोबत किनारपट्टीलगत अतिवृष्टीचा इशारा व्यक्त करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळपासून रत्नागिरी येथीन 360 किमी आणि मुंबईपासून 490 किमी नैऋत्येकडे अरबी समुद्रात क्यार वादळ घोंगावत होते. त्याचसोबत बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहेत. तसेच अरबी समुद्रात ढगांची दाडी होत मुसळधार पावसाने गावांना झोडपून काढले आहे.(मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे हवामान खात्याकडून Yellow Alert जाहीर)